Mazi Ladki Bahin Yojana : चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज? 

भागवत हिरेकर

Majhi ladki bahin yojana documents in marathi : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले जात आहेत. पण, अर्ज कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे द्यायचा याबद्दल अनेकांना माहिती नाही. या योजनेबद्दलची सर्व माहिती वाचा...

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वाचा तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती वाचा...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती

point

माझी लाडकी बहीण योजना नियम व अटी

point

माझी लाडकी बहीण योजना पैसे

Mazi ladki bahin yojana maharashtra online apply : राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. पण, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज भरताना कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कुठे आणि कसा भरायचा याबद्दल गोंधळ आहे. तुम्हालाही या योजनेबद्दल माहिती नसेल, तर जाणून घ्या... (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Documents, online apply and pdf form)

Mazi ladki bahin yojana : कधीपासून मिळणार पैसे? कोणाला लाभ मिळणार?

महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार. 

या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत. त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. 

माझी लाडकी बहीण योजना पात्रतेचे निकष

1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. 
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. 
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

हे वाचलं का?

    follow whatsapp