PM मोदींशी ‘या’बाबत झाली चर्चा, शरद पवारांची मुंबई Tak ला Exclusive माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ 20 मिनिटं चर्चा झाली. पण या भेटीची बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चांना उधाण आलं. खरं म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कशाबद्दल चर्चा झाली याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलं आहे. याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाते आहे. मात्र यावेळी शरद पवार यांची पंतप्रधान मोदींसोबत नेमकी कशाबाबत चर्चा झाली याविषयी स्वत: पवारांनी मुंबई Tak ला माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान मोदीशी झाली पवारांची चर्चा

या भेटीबाबत शरद पवार यांनी मुंबई Tak सोबत बोलताना अशी माहिती दिली आहे की, ‘पंतप्रधान मोदींसोबत झालेली भेट ही फक्त ईडीच्या कारवाईंबाबत नव्हती तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, युक्रेन युद्ध, वाढती महागाई तसेच तेलाच्या वाढत्या किंमीत या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.’ असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

शरद पवार नेमके कशासाठी भेटले असावेत पंतप्रधान मोदींना?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. या आरोपांवरुन त्यांची ईडी आणि सीबीआय चौकशीही सुरु आहे. आजच अनिल देशमुख यांनी सीबाआयने आर्थर रोड जेलमधून 100 कोटींच्या वसुलीप्रकरणात आपल्या ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक हे देखील तुरुंगात आहेत.

ADVERTISEMENT

मलिक यांच्या विरोधात दाऊद इब्राहिम आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींशी जमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे शरद पवार यांच्या काही कुटुंबीयांवर देखील ईडी आणि आयकर विभागाने आतापर्यंत कारवाई केली आहे. तसंच ईडीची कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात देखील सुरु आहे. याच सगळ्या प्रकरणात डॅमेज कंट्रोलसाठी तर आजची भेट झाली नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

याशिवाय राज्य सरकारने देखील ईडीबाबत एक SIT स्थापन केली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे तसेच विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर यांच्याविरोधातही कारवाई सुरु आहे. अशावेळी याच मुद्द्यावर प्रविण दरेकर असं म्हणाले आहेत की, शरद पवार हे डॅमेज कंट्रोलमध्ये निष्णात आहे. पण पंतप्रधान मोदी त्यांच्या बोलण्याला भुलणार नाहीत. त्यांनी जे ठरवलं आहे ते करणारच.

दरम्यान, असं असलं तरीही जेव्हा दोन बड्या नेत्यांची भेट होते तेव्हा त्यावेळी काही तरी नक्कीच महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झालेली असते ज्यामुळे नव्या राजकारणाची सुरुवात होण्याची शक्यता असते.

मोठी बातमी.. शरद पवारांनी अचानक घेतली PM मोदींची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT