कोल्हापूर : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर शाररिक अत्याचार करणाऱ्या बापाला कोल्हापूर न्यायालयाने ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ माजली होती. या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. व्ही. जोशी यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणातलं वैशिष्ट म्हणजे फिर्यादी, तिची सासू आणि पीडित मुलीनेही नंतर आपली साक्ष फिरवली. परंतू न्यायालयाने सरकारी […]
ADVERTISEMENT

स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर शाररिक अत्याचार करणाऱ्या बापाला कोल्हापूर न्यायालयाने ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ माजली होती. या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. व्ही. जोशी यांच्या न्यायालयात झाली.
या प्रकरणातलं वैशिष्ट म्हणजे फिर्यादी, तिची सासू आणि पीडित मुलीनेही नंतर आपली साक्ष फिरवली. परंतू न्यायालयाने सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी बाप आकाश लाटकरला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कोल्हापुरातील टेंबलाईवाडी इथल्या महेकर गल्लीत आकाश लाटकर, त्याची पत्नी सरिता, आई, मुलगा आणि मुलगी असं कुटुंबिय राहतं. आकाशचे वडील सांगली फाटा इथं राहतात. सरीता लाटकर आणि तिची सासू या राजारामपुरी इथल्या एका दवाखान्यात काम करतात. आकाश लाटकर हा काहीही काम धंदा करत नव्हता. 9 सप्टेंबर 2020 रोजी पत्नी आणि आई कामावर गेली होती. त्यावेळी आकाश आणि त्याची अल्पवयीन मुलगी घरी होते. या मुलीला त्यांन वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिला जबरदस्तीन अश्लील व्हिडिओ पहायला लावले.