CRPF जवानाकडून ऑनर किलिंग, बहिणीला प्रियकरासोबत बोलताना बघितलं अन् संतापला, रात्रीतून काटा काढला

मुंबई तक

Crime News : मनीष यादव हा 18 फेब्रुवारी रोजी आपल्या घरातून कोचिंग क्लासला जातो असे सांगून बाहेर पडला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. 20 फेब्रुवारीच्या सकाळी इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे ट्रॅकजवळ एका गोणीत बंद असलेला त्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना अपघाती वाटावी आणि पुरावे नष्ट व्हावेत, या उद्देशाने मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकण्यात आला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CRPF जवानाकडून ऑनर किलिंग

point

बहिणीला प्रियकरासोबत बोलताना बघितलं अन् संतापला

point

रात्रीतून काटा काढला

UP Crime News : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नगला बधा गावातील 25 वर्षीय मनीष यादव या तरुणाची हत्या करण्यात आली असून, या प्रकरणाच्या पोलीस तपासानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या  हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) एक जवान असून, त्याने 'ऑनर किलिंग'च्या नावाखाली ही निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

नेमकी घटना काय?

मनीष यादव हा 18 फेब्रुवारी रोजी आपल्या घरातून कोचिंग क्लासला जातो असे सांगून बाहेर पडला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. 20 फेब्रुवारीच्या सकाळी इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे ट्रॅकजवळ एका गोणीत बंद असलेला त्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना अपघाती वाटावी आणि पुरावे नष्ट व्हावेत, या उद्देशाने मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकण्यात आला होता. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि डिजिटल एक्स-रे अहवालातून ही हत्या एका नियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.

हत्येचे कारण: प्रेमप्रकरण आणि संशय

पोलीस तपासात या हत्येमागे अभिषेक यादव नावाचा सीआरपीएफ जवान असल्याचे निष्पन्न झाले आहे. अभिषेकची बहीण उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत असून ती सध्या रामपूर येथे प्रशिक्षण घेत आहे. पोलीस माहितीनुसार, अभिषेकने मनीषला आपल्या बहिणीसोबत बोलताना आणि एकत्र फिरताना पाहिले होते. यावरून त्याच्या मनात रागाची भावना होती आणि त्याने मनीषचा काटा काढण्याचे ठरवले.

हे वाचलं का?

    follow whatsapp