सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानच्या हत्येचाच रचला होता कट
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनं खळबळ उडालीये. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडने त्यांच्यी हत्या केल्याची माहिती समोर आलीये. २९ मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने यापूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानलाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. सिद्धू मुसेवालाची हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट […]
ADVERTISEMENT
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनं खळबळ उडालीये. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडने त्यांच्यी हत्या केल्याची माहिती समोर आलीये. २९ मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने यापूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानलाही जिवे मारण्याची धमकी दिली होती.
ADVERTISEMENT
सिद्धू मुसेवालाची हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. महत्त्वाचं म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातूनच सलमान खान मारण्याची धमकी दिली होती.
“मुझे गलत मत समझो…” सिद्धू मुसेवालाची अखेरची पोस्ट चर्चेत
हे वाचलं का?
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी का दिली होती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचं कारण म्हणजे सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजातून येतो. त्यामुळेच काळवीट प्रकरणात जेव्हा सलमान खानला आरोपी बनवलं गेलं, तेव्हा लॉरेन्स खूपच नाराज झाला होता आणि त्यामुळेच त्याने सलमानला मारण्याची धमकी दिली होती.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग,
का करण्यात आली हत्या?
ADVERTISEMENT
सलमान खानच्या हत्येचा लॉरेन्स बिश्नोईने प्लानिंगही केलं होतं. रेडी चित्रपटाच्या शुटिंगवेळी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र, त्यावेळी त्याचा डाव पुर्ण होऊ शकला नाही. त्यावेळी बिश्नोईला त्याच्या आवडीचं शस्त्र मिळालं नव्हतं आणि त्यामुळेच त्याने सलमान खानवर हल्ला केला नव्हता.
लॉरेन्स बिश्नोई दिल्लीतील तिहार तुरुंगातूनच या गोष्टी करतो. व्हॉट्स अॅप द्वारे तो सुपारी घेणं, हत्या करणं ही काम करतो. त्यानंतर फेसबुकवरून केलेल्या गुन्ह्याची माहिती देतो. त्याच्या या गँगचं नेटवर्क संपुर्ण देशात पसरलेलं आहे.
ADVERTISEMENT
Sidhu Moose Wala Death: दिल्लीच्या तिहार तुरुंगातच रचण्यात आला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट
लॉरेन्स बिश्नोईच्या गँगशी जोडलेले देशभरात ७०० पेक्षा अधिक लोक आहेत. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड हे सोबतच काम करतात. लॉरेन्स बिश्नोई हा तुरुंगातूनच त्याचा कॅनडातील गँगस्टर मित्र गोल्डी बराडशी बोलत असतो. त्याने त्याच्याशी बोलूनच सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आहे.
सिद्धू मुसेवालावर झाडले ३० राऊंड
२९ मे रोजी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडच्या सांगण्यावरून सिद्धू मुसेवालाची भरदिवसा हत्या करण्यात आली. त्याच्यावर ३० राऊंड फायर करण्यात आले. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सिद्धू मुसेवालाला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या.
या प्रकरणात पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला अटक केली. शाहरुखने पोलीस चौकशीत गँगस्टर गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिश्नोईची नाव सांगितली. पोलीस चौकशीत तब्बल ८ नाव समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी कुणाची नावं येणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT