Lockdown: दोन तासात लग्न आटपा नाहीतर 50 हजारांचा दंड, 22 तारखेपासून नवे निर्बंध
कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी 22 एप्रिलपासून राज्यात नव्या गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या आहेत. कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे राज्यात आधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. आता 22 एप्रिलपासून हे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्यात आज दिवसभरातही 67 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळेच आता राज्य सरकारतर्फे आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात […]
ADVERTISEMENT

कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी 22 एप्रिलपासून राज्यात नव्या गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या आहेत. कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे राज्यात आधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. आता 22 एप्रिलपासून हे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्यात आज दिवसभरातही 67 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळेच आता राज्य सरकारतर्फे आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये आता 15 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती
मंत्रालयातले कर्मचारी आणि केंद्र सरकारचे कर्मचारी यांची मुंबईतील कार्यालयं, इतर भागांमधली कार्यालयं या सगळ्यांनी नियम पाळणं आवश्यक
खासगी कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के उपस्थिती अपेक्षित आहे, बाकीच्यांनी वर्क फ्रॉम होम करावं