एक मुख्यमंत्री बाकीचे सुपर मुख्यमंत्री ! Lockdown-Unlock च्या गोंधळावर फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

मुंबई तक

गुरुवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची घोषणा केली, मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप अनलॉक जाहीर झालेलं नाही असं सांगितलं. या यू-टर्नमुळे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना काल दिवसभर टीकेचा सामना करावा लागला. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. या सरकारमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गुरुवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची घोषणा केली, मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप अनलॉक जाहीर झालेलं नाही असं सांगितलं. या यू-टर्नमुळे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना काल दिवसभर टीकेचा सामना करावा लागला. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत आणि बाकीचे सुपर मुख्यमंत्री आहेत. कुठल्याही सरकारमध्ये एखाद्या पॉलिसीवर निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. परंतू या सरकारमध्ये एकाच विषयावर ५-५ मंत्री बोलतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या श्रेयवादाची लढाई सुरु आहे. याच लढाईतून हा गोंधळ झाला असल्याचं फडणवीस म्हणाले. फडणवीस नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त घालावी, लोकांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही महत्वाच्या विषयावर सरकारने थेट बोलावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या गोंधळावरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

लॉकडाउनच्या सारख्या निर्णयामध्ये एवढा गोंधळ कसा होतो असं विचारत सरकारच्या बालिशपणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp