भोंगा वाद: ‘…तर कारवाई करु’, 3 तारखेच्या अल्टीमेटमबाबत पोलिसांकडून मनसेला नोटीस
कल्याण: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून यासाठी पोलीस यंत्रणेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे . कल्याण डोंबिवली मधील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह कार्यकर्त्यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस पाठवल्या आहेत. नोटीस दिल्यानंतर आपण किंवा कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न […]
ADVERTISEMENT

कल्याण: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून यासाठी पोलीस यंत्रणेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे .
कल्याण डोंबिवली मधील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह कार्यकर्त्यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस पाठवल्या आहेत. नोटीस दिल्यानंतर आपण किंवा कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यास येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पाहा पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय:
खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण आम्हास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे नोटीस देण्यात येते की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानच्या वेळी मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिनांक 3.05.2022 रोजी नंतर पासून मशिदीवरील भोंगे काढून टाकण्याबाबत चेतावणी दिली आहे.