महागाईच्या वणव्याची झळ वाढली, LPG सिलेंडरच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. LPG सिलेंडरच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात सिलेंडरच्या किमतीत वाढ होण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे.

घरगुती वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत साडेतीन रुपयांनी तर व्यवसायिक वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत 8 रुपयांनी वाढली आहे.

आज झालेल्या दरवाढीनंतर देशभरातील जवळपास सर्व महत्वाच्या शहरांमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलेंडरची किंमत 1 हजाराच्या पार जाणार आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांत गॅस सिलेंडरची किंमत 1003 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे कोलकाता शहरात गॅसची किंमत 1029 रुपये तर चेन्नईत गॅसची किंमत 1018 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याआधी 7 मे ला गॅस सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सिलेंडर दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT