मुंबईत ‘महाराष्ट्र बंद’ कसा मिळाला प्रतिसाद?; महत्त्वाचे क्षण बघा कॅमेऱ्याच्या नजरेतून…
लखीमपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एक दिवसीय बंदची घोषणा केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी या बंद राहतील अशी घोषणा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली होती. याच कारणामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर आज तुरळक गर्दी पहायला मिळाली. या बंदचा फटका काही प्रमाणात शहरातील BEST बससेवेला बसला. सकाळच्या सत्रात अनेक बससेवा रद्द असल्यामुळे कंडक्टर-चालक हे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
लखीमपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एक दिवसीय बंदची घोषणा केली होती.
हे वाचलं का?
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी या बंद राहतील अशी घोषणा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली होती.
ADVERTISEMENT
याच कारणामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर आज तुरळक गर्दी पहायला मिळाली.
ADVERTISEMENT
या बंदचा फटका काही प्रमाणात शहरातील BEST बससेवेला बसला.
सकाळच्या सत्रात अनेक बससेवा रद्द असल्यामुळे कंडक्टर-चालक हे आगारात पुढील सूचना मिळायची वाट पाहत होते.
या बंदमुळे एरवी गजबजलेल्या बस आगारात आज शांतता पहायला मिळाली. कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली होती.
मुंबईत काही भागांमध्ये या बंदला हिंसक वळणही लागलं. आंदोलनकर्त्यांनी ८ बेस्ट बसची तोडफोड केल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. सविस्तर बातमी इथे वाचा
खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने अनेक आगारांमधील बससेवा तात्पुरत्या रद्द केल्या होत्या.
महाविकास आघाडीतला घटकपक्ष असलेल्या शिवसेनेमुळे मुंबईत या बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला.
सुरुवातीला व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध करत दुकानं उघडीच ठेवणार अशी भूमिका घेतली होती.
परंतू राज्य शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
कोणताही अनुचित प्रसंग होऊ नये यासाठी मुंबईतल्या महत्वाच्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
आजच्या बंदमुळे बंद दुकानाबाहेर कर्मचारी बसून होते…
कोरोना काळात झालेल्या नुकसानामुळे या बंदत आम्हाला खेचू नका अशी भूमिका दुकानदारांनी घेतली होती. बंद दुकानाबाहेर चिंतेत बसलेला एक दुकानदार…
बंद यशस्वी व्हावा यासाठी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकानं बंद ठेवायला भाग पाडत होते. संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा
मुंबईसह ठाण्यात काही भागांत आंदोलनकर्ते आणि व्यापाऱ्यांमध्ये दुकानं बंद ठेवण्यावरुन चांगलीच बाचाबाची झालेली पहायला मिळाली.
मुंबईतल्या बहुतांश रस्त्यांवर आज अशाच पद्धतीचं चित्र पहालला मिळालं.
सत्ताधारी पक्षाने आजचा बंद यशस्वी झाल्याचं म्हटलं असलं तरीही विरोधकांनी या बंदवर टीका करत आजचा बंद फसल्याचं म्हटलंय. संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आजच्या बंदवरुन सोशल मीडियावरही अनेक संमिश्र प्रतिक्रीया पहायला मिळाल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT