Maharashtra corona update : कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी राज्यातील काही भागांत प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णसंख्येचा आलेख स्थिरावताना दिसत असून, शुक्रवारी दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ३६५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९६.९७ टक्के इतका आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं राज्य सरकारनं म्हटलं […]
ADVERTISEMENT

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी राज्यातील काही भागांत प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णसंख्येचा आलेख स्थिरावताना दिसत असून, शुक्रवारी दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ३६५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९६.९७ टक्के इतका आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं राज्य सरकारनं म्हटलं असून, दररोजच्या रुग्णसंख्येतही मोठी घट झाली आहे. राज्यात दररोज चार ते पाच हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत असून, तीन दिवसानंतर राज्यात चार रुग्ण आढळून आले. गेले दोन दिवस राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते.
आजचे आकडे काय सांगतात?
राज्यात आज ६ हजार ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ लाख २१, ३०५ इतकी आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९६.९७ टक्के इतका आहे.










