Sunil Prabhu: शिंदे गटाला पुन्हा दिलासा! शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात का घेतली होती तातडीने धाव?
शिवसेनेविरोधात बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. महाराष्ट्रातील राजकीय नाट्य आणखी लांबत जाण्याची शक्यता दिसत आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेनं […]
ADVERTISEMENT

शिवसेनेविरोधात बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महाराष्ट्रातील राजकीय नाट्य आणखी लांबत जाण्याची शक्यता दिसत आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा एकदा दरवाजे ठोठावले. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ठाकरे सरकार गेलं आणि राज्यात शिंदे सरकार आलं.
देवेंद्र फडणवीस-धनंजय मुंडे यांची मध्यरात्री १२ वाजता भेट; दोघांमध्ये अर्धा तास झाली चर्चा
नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावण्यात आलं असून, शिवसेनेनं पुन्हा एकदा १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाकडे न्यायालयाचे (सुप्रीम कोर्ट) लक्ष वेधलं आहे. जोपर्यंत १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय न्यायालयाकडून दिला जात नाही, तोपर्यंत बहुमत चाचणी घेण्याला स्थगिती दिली जावी, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.