MLC election 2023 : मविआ, युतीचे उमेदवार बाळासाहेब ठाकरेंनाच विसरले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-धनंजय साबळे, अकोला

ADVERTISEMENT

Amravati graduate constituency election 2023 : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपापासून (Maharashtra political crisis) आम्हीच खरी शिवसेना (Shiv Sena) आणि बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) खरे वारसदार असल्याचं दाखवण्यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) चढाओढ लागलीये. मतं मागताना बाळासाहेब ठाकरेंचं नावही पुढे केलं गेल्याचं दिसलं, पण आता विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra legislative council election) मविआ (MVA) आणि युतीला (NDA) बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) विसर पडलाय. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंना स्थानच दिलेलं नाही.

अमरावती पदवीधर मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी आणि युतीच्या उमेदवारांनी जोराद प्रचार सुरू केलाय. विधान परिषद निवडणुकीतील दोन्ही बाजूंच्या उमेदवारांकडून अकोल्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीये. अकोल्यात दोन्ही गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरेंना स्थानच देण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे.

हे वाचलं का?

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार म्हणून माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील रिंगणात आहे, तर महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे निवडणूक लढवत आहेत.

ADVERTISEMENT

Thackeray यांचा प्लॅन, कदम पिता-पुत्रांना धक्का? बड्या नेत्याची घरवापसी?

ADVERTISEMENT

अमरावती पदवीधर मतदारसंघ : बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवारांना विसर

महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. तर भाजपसोबत बाळासाहेबांची शिवसेनेचा आहे. मात्र मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमध्ये लागलेल्या बॅनर होर्डिंग आणि फ्लेक्सवर दोन्ही गटांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडलाय. दोन्ही उमेदवार सोयीस्करपणे विसरल्याचं दिसत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे फक्त राजकारणात भावनिक मुद्द्यापुरतेच मर्यादित आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने दोन्ही गटातील शिवसैनिकांकडून केला जात आहे.

Shiv Sena : ठाकरे-शिंदेंना अजून वाट बघावी लागणार! आयोगात आज काय घडलं?

रणजीत पाटलांच्या बॅनरवर कुणाचे फोटो?

अकोला शहरात लावण्यात आलेल्या उमेदवार रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आले. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावलेला नाही.

धीरज लिंगाडेंच्या प्रचार फलकावर…

धीरज लिंगाडे यांच्या प्रचार बॅनर्सवर सोनिया गांधी, मलिकार्जून खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील, मुकुल वासनिक यांना स्थान देण्यात आले, परंतू, लिंगाडेंच्या बॅनर्सवरही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT