आरोग्य विभाग भरतीची प्रश्नपत्रिका ‘न्यासा’च्या अधिकाऱ्यांनीच फोडली; छपाईवेळीच केला प्रताप
आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील विविध पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची चौकशी केली असता परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्यात आल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा घेणाऱ्या […]
ADVERTISEMENT

आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील विविध पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची चौकशी केली असता परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्यात आल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा घेणाऱ्या ‘न्यासा’च्या अधिकाऱ्यांनीच फोडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुंपनानेच शेत खाल्लं?
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणाबद्दल आज माहिती दिली. ‘आतापर्यंत पाच पेपरफुटी प्रकरणांमध्ये 18 जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांकडून जवळपास 6 कोटींचा मुद्देमाल आणि ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे. 24 तारखेला झालेल्या आरोग्य विभागाच्या गट ‘क’ प्रवर्गातील परीक्षेचा पेपरही फुटला होता’, असं आयुक्त म्हणाले.
‘भरती परीक्षेत महाघोटाळा; आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची CBI चौकशी करा’