आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी ढकलली पुढे; राजेश टोपे म्हणाले ‘विद्यार्थ्यांची माफी मागतो’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील आरोग्य विभागातील गट क व ड श्रेणीतील रिक्त पदांसाठीची होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रात्री ९ वाजता ही माहिती दिली. या निर्णयाबद्दल टोपे यांनी विद्यार्थ्यांची माफीही मागितली. अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्यानं परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचा मात्र हिरमोड झाला.

ADVERTISEMENT

राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी होत असलेल्या परीक्षेतही एमपीएससी परीक्षेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. एमपीएससी परीक्षेप्रमाणेच आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी रात्री माध्यमांशी बोलताना दिली.

राजेश टोपे म्हणाले, ‘आरोग्य विभागाची आज आणि उद्या होणारी भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो’, असं राजेश टोपे म्हणाले.

हे वाचलं का?

राज्यात आज (२५ सप्टेंबर) आणि उद्या (२६ सप्टेंबर) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. गोंधळी कारभारामुळे परीक्षा चर्चेत आली होती. भरती परीक्षा महाराष्ट्रात होत आहे, मात्र काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर इतर राज्यांतील परीक्षा केंद्रांची नावं आली आहेत.

या चुकीबद्दलही टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. ‘एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा आलं. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला होता. पण ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे’, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.

ADVERTISEMENT

नियोजनात गोंधळ…

ADVERTISEMENT

आरोग्य विभागातील पदांसाठी होत असलेल्या परीक्षांच्या नियोजनातील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. राज्य सरकारने परीक्षेच्या काही तास आधी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील तब्बल ८ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याची परिस्थिती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT