महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची बाधामहाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अनिल देशमुख यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. “आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन मी करतो. लवकरच मी कोरोनावर मता करुन पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन. ” असं अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे अनिल देशमुख यांचं ट्विट?

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नुकताच विदर्भाचाही दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोना झाला असावा अशी शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच संपर्कात आलेल्या सगळ्यांना कोरोनाची चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मागील नऊ महिन्यांच्या कालावधीत पोलीस खात्यातले अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाची लगाण झाली. या कठीण काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः विविध ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना धीरही दिला. पोलिसांप्रती असलेला अभिमानही वारंवार त्यांच्या बोलण्यातून जाणवला आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येते आहे. मुंबईत सर्वसामान्यांसाठी वेळांच्या मर्यादा घालून लोकल सेवाही सुरु करण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT