Money Laundering Case : अनिल परब ईडीच्या चौकशीला जाणार नाहीत, कारण…
राज्याच परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले अनिल परब यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे. अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याची माहिती अनिल परब यांनी ‘मुंबई तक’ला दिली आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शिवसेनेचे नेते […]
ADVERTISEMENT

राज्याच परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले अनिल परब यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे. अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याची माहिती अनिल परब यांनी ‘मुंबई तक’ला दिली आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावलं. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते असल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. दापोलीमधील रिसॉर्ट प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं असून, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रिसॉर्ट प्रकरणात आरोप केलेले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने अनिल परब यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं.
आज (१४ जून) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात ईडीने अनिल परब यांना समन्स बजावलं होतं. ईडीच्या समन्सनंतर अनिल परब चौकशीसाठी जाणार की नाही, याकडे लक्ष होतं.