नाशिक रेल्वे स्थानकात बर्निंग ट्रेनचा थरार! उभी असलेली एक्स्प्रेस पेटल्याने आगीचे लोळ आणि धुराचे लोट

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्थानकात आज द बर्निंग ट्रेनचा थरार पाहण्यास मिळाला. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या हावडा एक्स्प्रेसला आग लागली. इंजिनने अचानक अचानक पेट घेतला त्यामुळे काही वेळातच काही मिनिटातच आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरलेले पाहण्यास मिळाले. या घटनेमुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी घाबरले. प्रवाशांची धावपळ आणि गदारोळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्थानकात आज द बर्निंग ट्रेनचा थरार पाहण्यास मिळाला. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या हावडा एक्स्प्रेसला आग लागली. इंजिनने अचानक अचानक पेट घेतला त्यामुळे काही वेळातच काही मिनिटातच आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरलेले पाहण्यास मिळाले. या घटनेमुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी घाबरले. प्रवाशांची धावपळ आणि गदारोळ पाहण्यास मिळाला. रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला.

मुंबईकडे येणारी हावडा एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती. सकाळी ८.३० च्या सुमारास अचानक एक्स्प्रेस इंजिनला आग लागली. सकाळी सुटलेला गार वाऱ्यामुळे या आगीने भराभर पेट घेतला. त्यामुळे प्रवासी अधिक घाबरले. आग वाढतच गेल्याने प्रवाशांनी पटापट जीव मुठीत घेऊन रेल्वेतून उड्या मारल्या. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात अख्खी एक्स्प्रेस रिकामी झाली.

आग अत्यंत भीषण होती. आगीचे लोळ आणि धुराचे लोट संपूर्ण स्टेशन परिसरात पसरले होते. सगळीकडे धूरच धूर झाल्याने माणसंही एकमेकांना दिसत नव्हते. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यात अडथळे येत होते.

आगीची माहिती मिळताच सर्वात आधी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी स्टेशनवर धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाली. सर्वांनी आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, आगीवर अजूनही नियंत्रण मिळवण्यात आलं नसल्याचं सांगितलं जात आहे.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. संपूर्ण डबाच जळून खाक झाला आहे. आगीचं नेमकं कारणं समजू शकलं नाही. इंजिन तापल्यानं ही आग लागली असावी असा कयास वर्तवला जात आहे.मात्र, आगीचं नेमकं कारण समजण्यासाठी या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp