SC: ठाकरेंचा जोरदार युक्तिवाद, शिंदे उद्या देणार उत्तर! कोर्टात काय घडलं?
supreme court on maharashtra crisis today : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत आज ठाकरे गटाने युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी नबाम राबिया प्रकरण आणि 10 शेड्यूल बद्दल […]
ADVERTISEMENT

supreme court on maharashtra crisis today : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत आज ठाकरे गटाने युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी नबाम राबिया प्रकरण आणि 10 शेड्यूल बद्दल युक्तिवाद केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवरही ठाकरे गटाने हरकत घेतली. (supreme court hearing On Maharashtra Political Crisis)
16 आमदारांच्या अपात्रतेसह इतर विषयांवरील याचिका शिंदे आणि ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणावर मागील सुनावणी 10 जानेवारी रोजी झाली होती. त्यानंतर आज (14 फेब्रुवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाने याचिकांवर 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी घेण्याच्या आग्रह धरला.
ठाकरे विरुद्ध शिंदे : सुनावणीचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
20 जून 2022 रोजी रात्रीच एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यांच्याबरोबर 39 आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Maharashtra Crisis: ठाकरेंची ‘लढाई’, सिब्बलांकडून कायद्याचा किस, वाचा 10 मुद्दे
शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी, राज्य सरकारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यासह इतर मुद्द्याबद्दल शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी आव्हान दिलेलं आहे.
Ulhas Bapat: ‘…तर शिंदे मंत्री राहणार नाही अन् सरकार कोसळेल’
दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षांकडून आमदारांना पाठवण्यात आलेल्या अपात्रता नोटिसा, शिवसेना विधिमंडळ नेतेपदावरून एकनाथ शिंदेंना दूर करण्याचा उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय आणि इतर मुद्द्यांना एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी याचिकांच्या माध्यमातून आव्हान दिलेलं आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर या सर्व याचिकांवर सुनावणी सुरू असून, आज घटनापीठात सुनावणी झाली. उद्याही (15 फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.
Maharashtra crisis: राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर बोट, कोर्टात काय घडलं?
ठाकरे गटाने सात सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी करण्याची मागणी का केलीये?
सर्वोच्च न्यायालयाने एका निकाला असं स्पष्ट केलं होतं की, ‘विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आली असेल, तर त्यावर विधानसभेत निर्णय होईपर्यंत अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय देता येणार नाही’, असा निकाल पाच सदस्यीय घटनापीठाने अरुणाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष नबाम रेबियाप्रकरणी काही वर्षांपूर्वी दिलेला आहे. याच निकालाचा फेरविचार करण्यासाठी सात सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे.