चंद्रकांत पाटलांच्याही तोंडाला तसा फेस आला होता; शिवसेनेचा ‘ईडी’वरून भाजपवर पलटवार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा दुसरा आरोप केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल’, असं म्हटलं. पाटलांच्या या विधानावरून शिवसेनेनं भाजपवर पलटवार केला आहे. ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शिवसेनेनं […]
ADVERTISEMENT

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा दुसरा आरोप केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल’, असं म्हटलं. पाटलांच्या या विधानावरून शिवसेनेनं भाजपवर पलटवार केला आहे.
ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांना खडेबोल सुनावले आहेत.
”ईडी’, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असं महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे व तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्याच नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ”ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला?’, असं खोचक सवाल शिवसेनेनं केला आहे.
‘कोल्हापुरातून पळ काढावा लागला’