Omicron : महाराष्ट्रात दिवसभरात सहा ओमिक्रॉनच्या रूग्णांची नोंद, एकूण संख्या 54
कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. अशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. महाराष्ट्रात दिवसभरात सहा रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या आता 54 झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये काय लक्षणं दिसतात? ओमिक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती – आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी 6 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. […]
ADVERTISEMENT

कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. अशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. महाराष्ट्रात दिवसभरात सहा रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या आता 54 झाली आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये काय लक्षणं दिसतात?
ओमिक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी 6 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर 1 रुग्ण पुणे जिल्ह्यातील आणि 1 रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 54 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
महाराष्ट्रात कुठे किती रूग्ण आहेत?
मुंबई- 22
पिंपरी-11
पुणे ग्रामीण- 7
पुणे मनपा- 3
सातारा-3
कल्याण डोंबिवली-2
उस्मानाबाद-2
बुलढाणा-1
नागपूर-1
लातूर-1
वसई-1
एकूण-54
यापैकी 28 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या 6 रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
मुंबईचे 4रुग्ण मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे .
2 रुग्ण कर्नाटक राज्यातील तर 1 रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी आहे.
यातील 2 जणांनी टांझानियाचा तर 2 जणांनी इंग्लंडचा प्रवास केलेला आहे.
हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात आहेत.
हे रुग्ण 21 ते 57 वर्षे या वयोगटातील असून यात 2 स्त्रिया तर 2 पुरुष आहेत.
आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील एका 5 वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉन विषाणूचे निदान झाले आहे. या रुग्णास कोणतीही लक्षणे नाहीत.
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील मध्यपूर्वेत प्रवास करुन आलेल्या 46 वर्षीय पुरुषांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळला आहे. या रुग्णाची लक्षणे सौम्य असून तो सध्या एका खाजगी रुग्णालयात भरती आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
Omicron: कोरोना व्हेरिएंट शोधण्याची पद्धत काय आहे? समजून घ्या सोप्या भाषेत
व्हेरिएंट आणि म्युटेशन म्हणजे काय?
व्हायरसचाही जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) असतो. व्हायरच्या जिनोममध्ये सातत्याने बदल होतं जातो, त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना व्हायरच्या जिनोममध्येही सातत्याने बदल होत असून, जगभरात चार व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (अल्फा, बीटा, गामा, डेल्टा ), तर दोन व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (ल्युम्ब्डा, म्यू) आढळून आले आहेत. यातच आता दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 हा व्हेरिएंट आढळून आला असून, तो व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आहे. B.1.1.529 या कोरोना व्हेरिएंट जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन व्हेरिएंट असं नाव दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेतील नेटवर्क फॉर जिनोमिक्स निगराणी नेटवर्क अर्थात NGS-SA (Network for Genomics Surveillance in South Africa) ला सोमवारी (22 नोव्हेंबर) हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट आल्याचं प्रथम जाहीर करण्यात आलं. या व्हेरिएंटमध्ये SARS-CoV-2 संबंधित व्हायरस आढळून आले आहेत.
ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये कोरोनाचे अनेक म्युटेशन आढळून आले आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटचा संसर्गांचा वेग प्रचंड असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल चार पटीने वाढ झाली असून, ही वाढ B.1.1.529 चा आढळून आल्यानंतर झाल्याचं दिसून आलं आहे.
NGS-SA ने सांगितलं की जोहान्सबर्ग आणि प्रिटोरियाचा समावेश असलेल्या गौतंग प्रातांत रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. कोरोना उद्रेक झाल्यानं ही रुग्णवृद्धी झाली असल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंट का धोकादायक मानला जातोय?
NGS-SA ने नव्या व्हेरिएंटच्या म्युटेशनबद्दल सांगितलं की ‘B.1.1.529 म्युटेशनची जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) खूप दुर्मिळ आहे. 30 म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाईक प्रोटीन हा असा भाग असतो, जिथे लस परिणामकारक ठरते. त्याचबरोबर स्पाईक प्रोटीनद्वारेच व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करून शरीरातील पेशी संक्रमित करण्यास सुरूवात करतो.
यात काही म्युटेशन आधीपासूनच असल्याचं आढळून आलं आहे. ज्यात अल्फा आणि डेल्टाचे म्युटेशनचा समावेश आहे. आतापर्यंत क्वचित असं आढळून आलं आहे, असंही NGS-SA ने या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटबद्दल म्हटलं आहे. व्हायरस प्रभावित करण्याची क्षमता आणि लसीचा प्रभाव याबद्दलचा अभ्यास केला जात असल्याचं आफ्रिकेतील साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सेंटर फॉर डिजिज कंट्रोल) म्हटलं आहे.