Maharashtra Corona Cases: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ, दिवसभरात किती नवे रुग्ण सापडले?
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8535 नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा वाढत असल्याचं यावेळी दिसून येत आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता देखील वाढत आहे. त्यातच कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट सापडत असल्याने त्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 156 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8535 नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा वाढत असल्याचं यावेळी दिसून येत आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता देखील वाढत आहे. त्यातच कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट सापडत असल्याने त्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.
दरम्यान, दिवसभरात 156 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,25,878 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 8535 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 165 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात 11 जुलै रोजी 6,013 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 59,12,469 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.02 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 156 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे.










