महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नापास, पंकजा मुंडे यांचा घणाघात
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार नापास आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीही नापास आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यातल्या सर्व पातळ्यांवर नापास झालं आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. बीड या ठिकाणी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. […]
ADVERTISEMENT

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार नापास आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीही नापास आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यातल्या सर्व पातळ्यांवर नापास झालं आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. बीड या ठिकाणी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. आत्तापर्यंत पंकजा मुंडे या उद्धव ठाकरेंच्या विरोधात थेट काही बोलल्या नव्हत्या आता मात्र त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
महाविकास आघाडी सरकारचं विश्लेषण करायचं म्हटलं की लोक उद्धव ठाकरे यांच्याबाबत चांगला विचार व्यक्त करतात. मात्र महाविकास आघाडी सरकारबाबत चांगला विचार करत नाहीत. ठाकरे सरकार सगळ्याच पातळ्यांवर नापास झालं आहे. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार नापास म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नापास झाले आहेत. अशा तीव्र शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केली आहे.
आणखी काय म्हणाल्या पंकजा मुंडे?









