नवाब मलिक कोठडीमध्ये, आजच शिक्षा सुनावल्यानं काय साध्य होणार आहे?; हायकोर्टाचा सवाल
NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीदरम्यान आज हायकोर्टाने याचिकाकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या घाईबद्दल प्रश्न उपस्थित केला. नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यामुळे आम्ही जरी त्यांना आजच शिक्षा सुनावली, तरीही त्याला काहीच अर्थ उरणार नाही, असं म्हणत हायकोर्टाने आजच्या दिवसाची सुनावणी स्थगित केली. वानखेडे यांच्या याकिवेर सुनावणी […]
ADVERTISEMENT

NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीदरम्यान आज हायकोर्टाने याचिकाकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या घाईबद्दल प्रश्न उपस्थित केला. नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यामुळे आम्ही जरी त्यांना आजच शिक्षा सुनावली, तरीही त्याला काहीच अर्थ उरणार नाही, असं म्हणत हायकोर्टाने आजच्या दिवसाची सुनावणी स्थगित केली.
वानखेडे यांच्या याकिवेर सुनावणी सुरु असताना, Advocate फिरोज भरुचा यांनी कोर्टासमोर येत याचिका मागे ठेवण्याची विनंती करत ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय मलिक यांची बाजू मांडणार असल्याचं सांगितलं. यावेळी जस्टीस एस.जे.काठावाला यांनी मलिक हे आधीच अटकेत आहेत. त्यामुळे जरीही त्यांना आम्ही आज शिक्षा सुनावली त्याने काय साध्य होणार आहे? असा प्रश्न विचारला. ज्यावर भरुचा यांनी निर्णय देण्याआधी आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली.
नवाब मलिक यांनी ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरसोबत नवाब मलिक यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांची ईडी सध्या चौकशी करत आहे. मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहे. जस्टीस काठावाला यांनी मलिकांच्या कोठडीची तारीख विचारली असता भरुचा यांनी ते 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत असल्याचं सांगितलं.
लवासामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना स्वारस्य, याचिका फेटाळताना बॉम्बे हायकोर्टाचं निरीक्षण