नालासोपारा : सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सिनेमा आणि शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो असं सांगून त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात पनवेल पोलिसांनी नेरळ भागातून एका व्यक्तीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

लॉरेन्स लुईस असं या आरोपीचं नाव आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 13 वर्षीय पीडित मुलीसह तिच्या मैत्रीणीसोबत त्याने मैत्री केली. या दोन्ही मुलींना लॉरेन्सने तुम्हाला वेब सिरीजमध्ये काम मिळवून देतो असं सांगत त्यांचे फोटोग्राफ मागवले. या दोन्ही मुलींचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने दोघींवरही लैंगिक अत्याचार केला.

मैत्रिणीला घरी बोलावलं, शीतपेयातून बियर पाजत केला बलात्कार; आरोपी अटकेत

हे वाचलं का?

आरोपीने संधी साधून दोन्ही मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने दोन्ही मुलींकडून 70 हजार रुपयेही उकळले. अखेरीस या त्रासाला कंटाळून दोन्ही मुलींनी आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. ज्यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पतीची तक्रार करायला गेलेल्या महिलेवर भाईंदरमध्ये पोलिसाचा बलात्कार

ADVERTISEMENT

नालासोपारा पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत पनवेल पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Crime: मावशीसोबत अनैतिक संबंध, गरोदर पत्नीच्या हत्येचं भयंकर प्रकरण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT