नाचता-नाचता अचानक तरुणाने स्वत:च्याच छातीत भोसकला चाकू, होळीदरम्यान धक्कादायक घटना
इंदूर: इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंद कॉलनीमध्ये एका तरुणाला होळी साजरी करतानाच जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे होळी सुरु होती आणि दुसरीकडे तरुण बेधुंद होऊन नाचत होता. पण अचानक तरुणाने चाकू काढून नाचता नाचता स्वतःच्याच छातीवर वार केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू […]
ADVERTISEMENT

इंदूर: इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंद कॉलनीमध्ये एका तरुणाला होळी साजरी करतानाच जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे होळी सुरु होती आणि दुसरीकडे तरुण बेधुंद होऊन नाचत होता. पण अचानक तरुणाने चाकू काढून नाचता नाचता स्वतःच्याच छातीवर वार केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
होलिका दहनाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत होता तरुण
ही घटना इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील गोविंद कॉलनीतील आहे. येथे राहणारा गोपाल (वय 38 वर्ष) हा तरुण होलिका दहनाच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत होता. गाण्यावर नाचत असतानाच त्याने हातात चाकू घेतला आणि छातीवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी चाकू गोपालच्या छातीत खोलवर घुसल्याने त्याच्या छातीतून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला.
मद्यधुंद अवस्थेत नाचत होते अनेक तरुण
