Manas Pagar: निकालाआधी सत्यजित तांबेंवर आघात! शेवटपर्यंत पाठिशी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Manas Pagar Death : राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीआधी (nashik graduate constituency election) सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर आघात झालाय. निवडणुकीत शेवटपर्यंत पाठिशी उभा राहणारा सहकारी सत्यजित तांबे यांनी गमावला. नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार (Manas Pagar) यांचं अपघाती (accident) निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीमुळे काँग्रेसमधील काही नेते सत्यजित तांबे यांच्यावर टीका करत असताना मानस पगार यांनी नाव न घेता या नेत्यांना सुनावलं होतं. (manas pagar Died in accident)

ADVERTISEMENT

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. नाशिक पदवीधरचा निकाल जाहीर होत असताना आणि तांबे समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना मानस पगार यांच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झाले. बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मानस पगार यांचा मृत्यू झाला. मानस पगार यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता. यावरून त्यांनी काँग्रेस नेत्यांनाही सुनावलं होतं.

हे वाचलं का?

MLC Election Results 2023 Live Updates: ‘मविआ’ला पहिला हादरा, भाजपने जागा हिसकावली

‘2-3 कारस्थानी टाळकी म्हणजे काँग्रेस नव्हे’

मानस पगार यांनी 30 जानेवारी 2023 रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमधून त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनाच घरचा आहेर दिला होता.

ADVERTISEMENT

मानस पगार यांची फेसबुक पोस्ट…

“3 पक्ष बदलून उमेदवार झालेल्यांना अनेक ठिकाणी बूथ लावायला माणसं भेटली नाहीत, त्यामुळे बूथ पण नव्हते. आता मार्जिन मोजत विजयाचं प्रमाणपत्र घेणं ही फक्त औपचारिकता उरली आहे.”

ADVERTISEMENT

“54 तालुके, 5 जिल्ह्यातील सुज्ञ आणि सुशिक्षित मतदारांनी निर्णय घेतलाय. एबी फॉर्मबद्दल अर्धसत्य सांगून दिशाभूल करणाऱ्यांचे आज नाक कापलं गेलंय. नाक गेलंय तरी भोकं उरलंय या अविर्भावात सोशल मीडियात वावरणाऱ्या मतदारसंघाबाहेरील तमाम अवलादींना आगाऊ शुभेच्छा”

“2-3 कारस्थानी टाळकी म्हणजे काँग्रेस नव्हे. बाकी काँग्रेसमध्येच होतो आणि काँग्रेसमध्येच आम्ही राहणार…”, असं मानस पगार यांनी विधान परिषद निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर म्हटलं होतं.

निःशब्द करणारी बातमी; सत्यजित तांबे शोकाकूल

मानस पगार यांच्या निधनानंतर सत्यजित तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे. “माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचं अपघाती निधन झालं. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे”, अशा भावना सत्यजित तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत.

रावसाहेब दानवेंच्या घरासमोरील आंदोलनामुळे वेधून घेतलं होत लक्ष

शेतकऱ्यांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दानंतर मानस पगार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेरच आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची राज्यभर चर्चाही झाली होती. या प्रकरणात पगार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटकही झाली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT