पुण्यातील Marathe Jewellers च्या प्रणव मराठेंना 5 कोटींच्या फसवणूक प्रकरणी अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे प्रणव मराठे यांना अटक आली आहे. गुंतवणूकदारांची पाच कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मराठे ज्वेलर्स योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं आमीष प्रणव मराठे यांनी दाखवलं आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केली. पाच कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठेंना कोथरूड पोलिसांनी गजाआड केलं आहे.

ADVERTISEMENT

प्रणव मराठे यांनी 18 गुंतवणूकदारांची पाच कोटींहून जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटक केल्यानंतर प्रणव मराठेंना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुभांगी काटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रणव मराठे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे ज्वेलर्समार्फत सोने, चांदी आणि मूळ रकमेवर जादा परतावा मिळेल असं आमीष नागरिकांना दाखवण्यात आलं होतं. यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले. पण बरेच दिवस होऊनही पैसे किंवा परतावा मिळाला नाही. शुभांगी काटे यांनी याबाबत ज्वेलर्सकडे विचारणा केली, मात्र ज्वेलर्सकडून काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर काटे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर प्रणव मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचलं का?

तपास करण्यात आला असता 18 गुंतवणूकदारांची तब्बल 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रूपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झालं आहे. या सर्व गुंतवणुकदारांचे पैसे प्रणव यांनी स्वतः फायद्यासाठी वापरल्याचं निष्पन्न झालं असून त्या आधारे प्रणव मराठेंना अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयात हजर केलं असता 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT