मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रुममधून नियमितपणे आढावा घेणार : CM शिंदे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 74  व्या वर्धापन दिनानिमित्त आज मराठवाड्यात विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी औरंगाबाद इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रुममधून नियमितपणे आढावा घेतला जाईल असा शब्द मराठवाड्याला दिला.

ADVERTISEMENT

‘समोर होता एकच तारा अन् पायतळी अंगार’ अशा ध्येयधुंद भावनांनी ज्यांनी या दिवसासाठी तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करले अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो असे म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्सीसंग्राम कार्यक्रमातील मनोगताला सुरुवात केली. ते म्हणाले, भारत १९४७ साली आणि हैदराबाद, मराठवाडा १९४८ साली स्वातंत्र्य झाला. हा मुक्तीसंग्राम म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक दैदिप्यमान पर्व होते, आणि आजच्या पिढीला या पर्वाची माहिती देणे, हा इतिहास माहिती करुन देणे ही काळाची गरज आहे.

स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वात हा लढा सुरु झाला. त्यांच्यासोबत या लढ्यात दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रवि नारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन अशा अनेक जणांनी या लढ्याचे नेतृत्व केले. मराठवाड्याच्या गावागावात हा मुक्तीसंग्राम लढला गेला. अनेक स्वातंत्र्यवीर जीवाची बाजी लावून पुढे आले. या मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे मोल करणे शक्य नाही. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या दगडाबाई शेळके यांच्याही योगदानाचा उल्लेख यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

हे वाचलं का?

मराठवाड्याच्या या पवित्र भुमीचे मला कायमच कुतूहल वाटले आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात सुरु झाल्यानंतर माझा मराठवाड्याशी जवळचा संबंध आला, अशा भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या. मराठवाड्यावर संतांचे संस्कार आहेत. मेहनती तरुण वर्ग, वाढणारे उद्योग, पर्यटनाला वाव आहे. मात्र तरीही आपल्याला विकासाची गती पकडायची आहे. इथला विकासांचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच संपूर्ण मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रुममधून नियमितपणे आढावा घेतला जाईल असा शब्दही यावेळी त्यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठवाड्यातल्या काही विकासकामांची माहिती दिली.

यात घृष्णेश्वर मंदिराच्या विकासासाठी १५७ कोटी रुपयांचा निधी, पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल, जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार, मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प, जालना पाणीपुरवठा नूतनीकरण, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी तरतुद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

लातूरमध्ये कृषी महाविद्यालयाची तरतूद, मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता अशा विविध विकासकामांचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तसंच रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामं वेगाने व्हावीत, यासाठीही भरीव तरतूद करण्यात आल्याचं यावेळी शिंदे यांनी सांगितले. मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी संपवण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT