मनसुख हिरेन यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमधून नवी माहिती समोर
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी ठाणे पोलिसांनी विस्तृत पोस्ट मार्टम रिपोर्ट रात्री जाहीर केला. आधी आलेल्या रिपोर्टमध्ये हिरेन यांच्या शरिरावर जमखा किंवा व्रण नसल्याचं समोर आलं होतं. परंतू रात्री आलेल्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मनसुख यांच्या शरिरावर काही खुणा असल्याचा उल्लेख आहे. परंतू या खुणा नेमक्या कशाचा आहेत हे मात्र कळू शकलेलं नाही. ठाणे पोलिसांनी पोस्ट मार्टम […]
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी ठाणे पोलिसांनी विस्तृत पोस्ट मार्टम रिपोर्ट रात्री जाहीर केला. आधी आलेल्या रिपोर्टमध्ये हिरेन यांच्या शरिरावर जमखा किंवा व्रण नसल्याचं समोर आलं होतं. परंतू रात्री आलेल्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मनसुख यांच्या शरिरावर काही खुणा असल्याचा उल्लेख आहे. परंतू या खुणा नेमक्या कशाचा आहेत हे मात्र कळू शकलेलं नाही. ठाणे पोलिसांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट जाहीर केला असला तरीही हिरेन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये.
ADVERTISEMENT
Chemical Analysis चा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण सांगितलं जाईलं अशी माहिती शनिवारी ठाणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. रात्री आलेल्या पोस्ट मार्टम रिपोर्टनुसार मनसुख यांच्या नाकपुडीजवळ, उजव्या बाजूच्या गालावर आणि उजव्या डोळ्याजवळ गडद लाल रंगाची खूण आहे. हिरेन यांचा मृत्यू ही आत्महत्या आहे की घातपात हे मात्र समजू शकलेलं नाहीये. परंतू विस्तृत अहवालात हिरेन यांच्या शरिरावर असलेल्या खुणा या मृत्यूच्या वेळी झालेल्या आहेत की नाही याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती कळू शकलेली नाही.
मला तपासयंत्रणांकडून त्रास दिला जातोय!
हे वाचलं का?
मुंब्रा खाडीत हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतू त्यांच्या पत्नीने हिरेन हे चांगले स्विमर होते. सोसायटीतल्या स्विमींग पूलमध्ये हिरेन आपल्या मुलांसह अन्य मुलांनाही पोहायला शिकवायचे. त्यामुळे हिरेन हे आत्महत्या करु शकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली.
‘पती आत्महत्या करु शकत नाही’, मनसुख हिरेनच्या पत्नीची प्रतिक्रिया
ADVERTISEMENT
घटनेच्या एक दिवस आधी मनसुख हिरेन सकाळी ८ वाजून २० मिनीटांनी घराबाहेर पडले. यानंतर रात्रभर मनसुख घरी परतलेच नाही. चिंतेत पडलेल्या परिवारातील सदस्यांनी थोडावेळ वाट पाहण्याचं ठरवलं. परंतू दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मनसुख यांचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे अखेरीस कुटुंबाने नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच दिवशी सकाळी सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथीळ खाडीत सापडला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT