उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्या – संजय राऊत
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या या कामगिरीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. बसपा अध्यक्ष मायावती, एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांना भाजपच्या विजयासाठी पद्मविभूषण, भारतरत्न सारखे किताब मिळायला हवेत असा टोला राऊत यांनी लगावला आहे. “भाजपने मोठा विजय मिळवला आहे. उत्तर […]
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या या कामगिरीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. बसपा अध्यक्ष मायावती, एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांना भाजपच्या विजयासाठी पद्मविभूषण, भारतरत्न सारखे किताब मिळायला हवेत असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
“भाजपने मोठा विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेश हे त्यांचंच राज्य होतं. तरीही अखिलेश यादव यांनी तिकडे चांगली लढत दिली, सपाच्या जागा तिप्पट वाढल्या आहेत. ४२ जागांवरुन ते १२५ जागांवर पोहचले आहेत. मायावती आणि ओवैसींनी भाजपला विजयात मदत केली, त्यामुळे पद्मविभूषण आणि भारतरत्न हे किताब मिळायला हवेत.”
शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा मतदारांची NOTA ला पसंती, गोव्यात आघाडीची खिचडी शिजलीच नाही
हे वाचलं का?
भाजपने चार राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली. यात आम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. आम्ही त्यांच्या आनंदात सहभागी आहोत. पण उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री का पराभूत झाले? गोव्याचे दोन माजी उप-मुख्यमंत्रीही का पराभूत झाले? असा सवाल राऊतांनी विचारला.
‘निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?’; शिवसेनेचं मोठं विधान
ADVERTISEMENT
पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीवर राऊतांनी टीका केली आहे. “सगळ्यात महत्वाची समस्या ही पंजाबमध्ये आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला तिकडे लोकांनी नाकारलं आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यासह अनेक बड्या नेत्यांनी पंजाबमध्ये निवडणूकीत प्रचार केला. तरीही पंजाबमध्ये तुमचा पराभव का झाला? उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड हे त्यांच्यात हातात होतं, त्यामुळे ते ठीकच आहे. पण आम्ही आणि काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये हरण्यापेक्षाही जास्त तुम्ही पंजाबमध्ये हरला आहात, असं संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT