‘५० खोके-एकदम ओके, मोकळं सांगून दिलेलं बरं…’; असं का म्हणाले गुलाबराव पाटील?
जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले, त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना ५० कोटी रुपये मिळाले अशा टीका विरोधी पक्षानं केल्या. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनावेळी विरोधकांनी पायऱ्यांवरती आंदोलन करताना ‘५० खोके एकदम ओक्के’ असा घोषणा देऊन विरोधकांना जेरीस आणले होते. आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना या घोषणेबद्दल स्पष्टच सांगितले […]
ADVERTISEMENT
जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले, त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना ५० कोटी रुपये मिळाले अशा टीका विरोधी पक्षानं केल्या. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनावेळी विरोधकांनी पायऱ्यांवरती आंदोलन करताना ‘५० खोके एकदम ओक्के’ असा घोषणा देऊन विरोधकांना जेरीस आणले होते. आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना या घोषणेबद्दल स्पष्टच सांगितले आहे.
ADVERTISEMENT
गुलाबराव पाटील भाषणात काय म्हणाले?
जळगावात लेवा समाजाचा गुणगौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील उपस्थित होते. ”व्यासपीठावर माझ्या एका बाजूला भाजपचे आमदार बसले आहेत, तर दुसऱ्या बाजूला ‘५० खोके आणि एकदम ओके’ म्हणजेच मी बसलो आहे. मोकळं सांगून दिलेलं बरं…बाकी कोणी सांगण्यापेक्षा मीच आज मी सांगून टाकतो,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
शंभुराज देसाईंचं वक्तव्यही राहिलं आहे चर्चेत?
पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पायऱ्यांवरती आंदोलन करताना विरोधक ५० खोके एकदम ओके असा घोषणा देत होते. त्यावेळी तिथून शंभुराज देसाई जात होते. शंभुराज देसाईंनी जशी ही घोषणा ऐकली त्यावेळी ते म्हणाले ‘तुम्हाला ५० खोके पाहिजे’ त्यावेळी शंभुराज देसाईंचं हे वक्तव्य चर्चेत होतं. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी हे वाक्य उच्चारताच उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला. पाटील यांच्या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला निशाणा केलं जाणार का? हे पाहावं लागणार आहे.
हे वाचलं का?
सत्ताधाऱ्यांच्याही घोषणा राहिल्या होत्या चर्चेत
‘अनिल देशमुख यांचे खोके…सिल्वर ओक ओके….लवासाचे खोके, सिल्वर ओक ओके….महापालिकेचे खोके, मातोश्री ओके….स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके…सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके,’ अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती दिल्या होत्या. त्यामुळे यावेळेसेचं अधिवेशन घोषणांनी गाजलं होतं असं म्हणायला हरकत नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT