सरकार कोसळावं म्हणून देव पाण्यात ठेवणारे स्वतःच पाण्यात जातील – वडेट्टीवारांचा केंद्रीय मंत्र्यांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार फारकाळ टिकणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री सी.टी.रवी यांचा विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. कल्याणमध्ये भाजप पक्ष संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलत असताना रवी यांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

ADVERTISEMENT

परंतू वडेट्टीवारांनी सरकार पडावं म्हणून देव पाण्यात बुडवून बसणारे स्वतःच पाण्यात जातील असं म्हटलं आहे.

“आमच्याकडे ज्योतिषी नाही, त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते त्यांचा अंदाज वर्तवत असतात. पण हवमाना खात्यासारखं त्यांचं ज्योतिष्य आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती आधार आणि महत्व द्यायचं…सरकार जाणार असं म्हणून दोन वर्ष केली पण सरकार टिकलं आहे आणि पुढेही टिकेल. पण सरकार जावं म्हणून देव पाण्यात बुडवून बसणारे स्वतःच पाण्यात जातील”, असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हे वाचलं का?

जाणून घ्या काय म्हणाले होते सी.टी. रवी?

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत आहोत. सध्याची परिस्थिती पाहता हे सरकार जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT