Ministry of Co-operation: मोदी सरकारचा मोठा निर्णय, ‘नव्या’ मंत्रालयाची निर्मिती; काय असेल या मंत्रालयाचं काम?
नवी दिल्ली: एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरु असताना आता दुसरीकडे मोदी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. ‘सहकारातून समृद्धी’ या टॅगलाइननुसार मोदी सरकारने केंद्रात आता स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’ (Ministry of Co-operation) तयार केले आहे. सहकार मंत्रालय हे देशातील सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर, धोरणात्मक चौकट उपलब्ध करुन देणार […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरु असताना आता दुसरीकडे मोदी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
‘सहकारातून समृद्धी’ या टॅगलाइननुसार मोदी सरकारने केंद्रात आता स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’ (Ministry of Co-operation) तयार केले आहे. सहकार मंत्रालय हे देशातील सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर, धोरणात्मक चौकट उपलब्ध करुन देणार आहे.
खरं पाहिल्यास हे मंत्रालय महाराष्ट्राच्या धर्तीवरच निर्माण करण्यात येत आहे. कारण सहकार क्षेत्राचं महत्त्व ओळखून अनेक वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात हे मंत्रालय तयार करण्यात आलं होतं. आता केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आल्याने सहकार क्षेत्राचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे.
हे वाचलं का?
आपल्या देशात सहकार आधारित आर्थिक विकासाचे मॉडेल अतिशय संबंधित आहे जिथे प्रत्येक सदस्य जबाबदारीच्या भावनेने कार्य करतो. हे मंत्रालय सहकारी संस्थांना व्यवसायाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि आणि बहु-राज्य सहकारी (MSCS)संस्थांच्या विकासासाठी काम करेल.
केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारानंतर भारताला लवकरच पहिले सहकार मंत्री मिळणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. बहुदा बुधवारीच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकेल. सरकारचा असा प्रयत्न आहे की, 8 जुलैदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आटोपायचा. दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नवे चेहरे सामील होऊ शकतात अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी राष्ट्रपतींनीही मोठे बदल केले आहेत. कारण मंत्रिमंडळ विस्ताराआधी 8 राज्यात नवीन राज्यपाल नेमण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
Cabinet Reshuffle: नारायण राणे, उदयनराजे भोसले, आणि प्रीतम मुंडे यांच्यापैकी मोदी सरकारमध्ये कोणाची वर्णी?
नारायण राणे दिल्लीत दाखल
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजप कार्यालयातून त्यांना फोन आल्यानंतर ते तात्काळ दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत दाखल होताच राणे यांना पत्रकारांनी मंत्रिपदाबाबत विचारणा केली. मात्र, त्याविषयी त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
नरेंद्र मोदी 2.0 सरकारचा आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नव्हता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना यात स्थान मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नारायण राणे यांच्याव्यतिरीक्त महाराष्ट्रातून हिना गावित, कपिल पाटील, पूनम महाजन, प्रीतम मुंडे यांची नावंही मंत्रीपदासाठी चर्चेमध्ये आहेत.
सध्याच्या केंद्रीय मंत्रीमंडळात अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिकच्या खात्यांचा पदभार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ही खाती नवीन मंत्र्यांकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामुळे 17 ते 22 मंत्र्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT