डोंबिवली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३३ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. Dombivali gangrape case : आणखी एका आरोपीला अटक, एकूण 33 जण अटकेत डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या […]
ADVERTISEMENT
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३३ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Dombivali gangrape case : आणखी एका आरोपीला अटक, एकूण 33 जण अटकेत
डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पप्पू सहानी असं या आरोपीचं नाव आहे. पप्पू सहानी हा कल्याण पूर्व भागातील कचोरे येथील गोविंदवाडी भागात राहतो. तो मुलुंड येथे भाजप कार्यालयात गटप्रमुख म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. हा गुन्हा रविवारी रात्री १० वाजल्याच्या दरम्यान घडल्याचं कळतंय.
हे वाचलं का?
पीडित मुलगी या भागात लहान मुलांच्या शिकवण्या घेते. आरोपीची मुलगीही याच पीडित मुलीकडे शिकवणीसाठी यायची. रविवारी संध्याकाळी पीडित मुलगी आरोपीच्या मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेली. यावेळी घरी परतत असताना आरोपी पप्पू सहानीने तिला रस्त्यात गाठून अंधाराचा फायदा घेत तिचा विनंयभंग केला. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
Dombivli Gang Rape च्या निमित्ताने! सोशल मीडियामुळे सामाजिक चळवळींची धार बोथट?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT