मुंबईतील बेपत्ता तरुणीचा मृतदेह पालघरमध्ये सापडला, प्रियकर अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– हुसेन खान आणि मुस्तफा शेख

२४ जानेवारीपासून मुंबईच्या सांताक्रूझ भागातून बेपत्ता झालेल्या कॅरल मिस्क्युट्टा उर्फ पिंकीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. पिंकीचा छिन्नविछीन्न मृतदेह पालघर पोलिसांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आढळून आला. पालघर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ सूत्र हलवत पिंकीचा बॉयफ्रेंड झिको मिस्क्युट्टा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅरल आणि झिको हे रिलेशनशिपमध्ये होते. २५ तारखेला कॅरल आईला, मी डॉक्टरकडे जाते आहे असं सांगून घराबाहेर पडली. झिको आणि कॅरल हे आपल्या स्कुटीवरुन पालघरला गेले. दोघंही वाघोबा घाटात पोहचले असताना दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. कॅरल आपल्याला लग्नासाठी दबाव टाकत असल्याचं झिकोने पोलिसांना सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महिलेने प्रियकराच्या साथीने मोठ्या दिराला संपवलं, ‘हे’ आहे हत्येचं कारण

या वादातून झिकोने आपल्याजवळ असलेल्या चाकूने कॅरलच्या गळ्यावर वार केला. झिकोचा मित्र कुमार देवेंद्र हा दुसऱ्या बाईकवरुन त्यांचा पाठलाग करत होता. देवेंद्रनेही कॅरलच्या चेहऱ्यावर वार केला. यानंतर दोघांनीही कॅरलचा मृतदेह घाटात पुरुन आपापल्या घरी धूम ठोकली. दुसरीकडे कॅरल बराच वेळ होऊनही घरी आली नसल्यामुळे तिच्या घरच्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दोन दिवसांनी तिच्या घरच्यांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गुरुवारी पालघर पोलिसांना कॅरलचा मृतदेह सापडला. परंतू त्यावेळी त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. यानंतर पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. हे तपासत असताना पोलिसांना कॅरल एका तरुणाच्या बाईकवर बसून जाताना दिसली. यानंतर पालघर पोलिसांनी बेपत्ता मुलीची तक्रार दाखल झाली आहे का याचा शोध सुरु केल्यानंतर त्यांना सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या कॅरलच्या तक्रारीबद्दल समजलं.

पुणे: लटकला ना भाऊ… पत्नीचं आधारकार्ड दाखवत गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये चेक-इन, अन्…

दाखल झालेल्या तक्रारीमध्ये करण्यात आलेलं वर्णन पालघर पोलिसांना सापडलेल्या मृतदेहासोबत जुळून येत होतं. कॅरलच्या घरच्यांनी या घटनेत झिकोवर संशय व्यक्त केल्यानंतर पालघर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर कॅरलच्या हत्येत सहभागी झालेला मित्र कुमार देवेंद्रलाही अटक करण्यात आली.

DNA Test, Finger Print Technology आणि अन्य सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध अत्यंत मजबूत खटला तयार करणार असल्याचं पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितलं. तपासअधिकारी निता पडवी या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT