‘सरकार पडलं तरी बेहत्तर पण…’ : बच्चू कडू गुवाहटीत कामाख्या देवीला मागणार आशीर्वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती : शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू हे देखील येत्या २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी स्वतः अमरावतीमध्ये याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. बच्चू कडू म्हणाले, आम्ही सर्वांनी श्री कामाख्या देवीला नवस केला होता, त्यामुळेच तर हे सरकार आलं.

ADVERTISEMENT

बच्चू कडू म्हणाले, सर्व आमदार जात आहेत, तर मी पण जाणार आहे. आम्ही सगळ्यांनी नवस केला होता म्हणून सरकार आलं. तसंच दिव्यांग मंत्रालयाची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही झाल्या पाहिजे, शेतकऱ्यांचे भलं झालं पाहिजे. सरकार पडलं तरी बेहत्तर पण शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे, अशी प्रार्थना आता कामाख्या देवीला करणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे गुवाहटी दौऱ्यावर :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान गुवाहटीहून परत येताना शिंदेंसह सर्वांनी श्री. कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर शिंदे आणि सहाकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री, मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता बंड यशस्वी झाल्याचा दावा करत एकनाथ शिंदे आणि सहकारी पुन्हा एकदा गुवाहटीला जाऊन कामाख्या देवीचा आशीर्वाद घेणार आहेत.

हे वाचलं का?

बच्चू कडूंवर झाले होते सेटलमेंटचे आरोप :

मागील काही दिवसांपूर्वी राज्यात प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटीला गेल्यानंतर सेटलमेंट केल्याचा आरोप केला होता. त्यावर बच्चू कडूंनी राणांना आव्हान देत हे आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं होतं. अखेरीस हा वाद शिंदे-फडणवीसांपर्यंत पोहचला आणि त्यानंतर राणा यांनी आपले आरोप मागे घेतले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT