Ravi Rana: बच्चू कडूंनी दम दिला तर जशास तसं उत्तर देणार! पुन्हा वाद पेटणार ?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बच्चू कडूंनी जर दम दिला तर जशास तसं उत्तर देऊ असं म्हणत रवी राणा यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद संपुष्टात आला असं वाटत असताना रवी राणा यांनी हे वक्तव्य केल्याने हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत.

ADVERTISEMENT

रवी राणा-बच्चू कडू अखेर समोरासमोर! शिंदे-फडणवीसांची मध्यस्थी, मध्यरात्री काय घडलं?

आमदार रवी राणा यांनी काय नेमकं काय म्हटलं आहे?

रवी राणाने उद्धव ठाकरे यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर कुणीच नाही. रवी राणा हा एकदा नाही तर दहावेळा प्रेमाची भाषा करेल. पण जर कुणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमकी आहे. पहिल्यांदा चूक केली म्हणून माफ करतोय असं बच्चू कडू यांनी म्हणत आमदार रवी राणांवर टीका केली होती. आज रवी राणा यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले रवी राणा?

बच्चू कडू यांनी दम दिला तर जशास तसं उत्तर देणार, कुणी दम देत असेल तर आमच्यात घरात घुसून मारण्याची हिंमत आहे. दोन पावलं मागे आलोय, दिलगिरीही व्यक्त केली आहे तरीही दम देत असेल कुणी तर ऐकणार नाही. हिंमत असेल तर निवडून येऊन दाखव असं एकेरीत येत आव्हानही बच्चू कडूंना रवी राणांनी दिलं आहे. उद्धव ठाकरेही आखडूपणा करत होते त्यांनाही धूळ खावी लागली असंही रवी राणांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT