बुलढाणा : ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; आमदार पुत्रांकडून मारहाण झाल्याचा आरोप
बुलढाणा : शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा वाद आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचला आहे का? असा सवाल सध्या बुलढाण्यात विचारला जात आहे. बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, […]
ADVERTISEMENT

बुलढाणा : शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा वाद आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचला आहे का? असा सवाल सध्या बुलढाण्यात विचारला जात आहे. बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, हा हल्ला शिंदे गटाकडून करण्यात आला असल्याचा आरोप संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला.
नेमके काय झाले बुलढाण्यात?
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. यावेळी काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित होता.
ठाकरे सरकारने पाठवलेली 12 आमदारांची नावं CM शिंदेंकडून मागे; अजित पवार म्हणतात…
दरम्यान संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी हा हल्ला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्याकडून करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.