Sanjay Gaikwad Audio Clip :आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल
Mla Sanjay Gaikwad Audio Clip viral : ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कामे असल्याचं वक्तव्य बुलढाणा मतदार संघाचे शिवसेनेच आमदार संजय गायकवाड (sanjay gaikwad) यांनी केले होते.त्याच्या या विधानानंतर वाद पेटलेला असतानाच आता त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये (Audio Clip viral) त्यांनी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाला शिविगाळ केल्याची माहिती […]
ADVERTISEMENT
Mla Sanjay Gaikwad Audio Clip viral : ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कामे असल्याचं वक्तव्य बुलढाणा मतदार संघाचे शिवसेनेच आमदार संजय गायकवाड (sanjay gaikwad) यांनी केले होते.त्याच्या या विधानानंतर वाद पेटलेला असतानाच आता त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये (Audio Clip viral) त्यांनी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाला शिविगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.( mla sanjay gaikwad audio clip viral abusing comment on government employees)
ADVERTISEMENT
राज्यात जुनी पेन्शन लागू (Old pension scheme) करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government employee protest) आंदोलने केले होते. या आंदोलना दरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बेताल वक्तव्य केले होते.या त्यांच्या वक्तव्यावर कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला होता.मात्र पुन्हा एकदा आमदार गायकवाड यांनी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाला फोनवरून शिवीगाळ करत वादग्रस्त विधान केले आहे. या फोनवरील संपुर्ण संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे. या ऑ़डिओ क्लिपमध्ये ते काय म्हणाले आहेत,ते वाचूयात.
ठाकरे-दरेकरांमध्ये विधानसभेबाहेर सहानुभूतीची युती! नेमकं काय घडलं?
हे वाचलं का?
ऑ़डिओ क्लिपमध्ये काय?
अध्यक्ष :हॅलो, गायकवाड साहेब आपण आमदार आहात…
आमदार :हो कोण बोलतोय
ADVERTISEMENT
अध्यक्ष : मी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष बोलतोय… आपण ९५ टक्के सरकारी कर्मचारी भ्रष्ट आहेत, हे म्हणण योग्य आहे का सर?
ADVERTISEMENT
आमदार : ते त्या पत्रकाराने चुकीचे सांगितल.त्याच्यावर मी बोलणार आहे.
अध्यक्ष : सर तुमचा बाईट आम्ही प्रत्यक्ष ऐकला…आमच्याबद्दल ऐवढी निष्ठूरता का आहे?
आमदार : आता खरं बोललो तर तुम्हाला लागेल. आम्हाला सार्वजनिक जीवनात ४० वर्ष झालीत.९५ टक्के हा आकडा चुकीचा आहे. पण ७५ टक्के, १०० टक्के भ्रष्ट कर्मचारी भ्रष्ट आहेत. हे माझं स्पष्ट मत आहे.
अध्यक्ष : तुम्ही आम्हाला जाहीरपणे भ्रष्ट आहात, असं कसं म्हणू शकता?
आमदार : हो म्हणणार बोललो मी व्हिडिओमध्ये पुरावे आहेत.
अध्यक्ष : याचा अर्थ तुम्ही पारदर्शक आणि स्वच्छ कारभार चालवता का?
आमदार :आमचं सोडा
अध्यक्ष : का बरं
आमदार :आम्हाला शिकवू नका
अध्यक्ष : शेवटी लोकशाही आहे ना सर
आमदार :भो……आवाज बंद कर
अध्यक्ष :अरे तुरे करू नका सर
Nagpur : आर्यन खानला अटक करणारे NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे RSS स्मृती मंदिरात
या ऑडियोमध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार (laxman naramwar) यांनी आमदार गायकवाड याना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी फोन केला होता.मात्र जाब विचारत असताना आमदार गायकवाड यांनी अध्यक्षाला उद्धटपणे बोलत शिवीगाळ केली.मात्र मुंबई तक या ऑडियो ची पुष्टी करत नाही.
Old Pension Scheme : अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
अजित पवारांची टीका
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) या प्रकरणावरून विधानसभेत आक्रमक झाले होते.सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी समंजस भूमिका दाखवायला पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात, ९५ टक्के शासकीय कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे. ज्यांच्याकडून आपल्याला कामे करून घ्यायची असतात.पाचही बोट सारखी नसतात हे आम्हालाही माहितीय. पण तुम्ही जर सगळ्यांनाच एका मोजमापात धरायला लागलात. जर ते नाउमेद झाले तर राज्य चालणार कसे असे अजित पवार म्हणाले आहे. दरम्यान संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT