संपत्तीत काही कोटींची घट तरीही प्रसाद लाड सर्व उमेदवारांना ‘भारी!’
राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता २० जूनला विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड हे सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रसाद लाड यांनी १५२ कोटींची संपत्ती जाहीर केली. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांनी २१० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. प्रसाद लाड […]
ADVERTISEMENT

राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता २० जूनला विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड हे सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रसाद लाड यांनी १५२ कोटींची संपत्ती जाहीर केली. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांनी २१० कोटींची संपत्ती जाहीर केली होती.
प्रसाद लाड यांची जंगम मालमत्ता ३२ कोटी ५९ लाख तर पत्नीच्या नावे ५४ कोटी ६५ लाख तसंच हिंदू अविभक्त कुटुंबाची ७४ लाखांची संपत्ती आहे. त्यामध्ये दोन हजार २४ ग्रॅम सोने, हिरे, चांदी, १२ महागड्या घड्याळांचाही समावेश आहे. लाड कुटुंबाची स्थावर मालमत्ता ६४ कोटी ४६ लाखांची आहे. त्यामध्ये प्रसाद लाड यांच्या नावावरील मालमत्ता ३० कोटी ९१ लाखांची आहे.
प्रसाद लाड यांच्या पत्नीच्या नावे २९ कोटी १५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. घरं, व्यापारी गाळे आणि जमिनींचा त्यामध्ये समावेश आहे. लाड कुटुंबाची ७८ कोटी ३६ लाख रूपयांची देणी आहेत. लाड हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेसह क्रिस्टल कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी नीता या आठ कंपन्यांमध्ये संचालक आहेत.
विधान परिषद निवडणुकीला उभे असलेले इतर उमेदवार प्रसाद लाड यांच्या जवळपासही नाहीत.