Satyjeet Tambe : ‘मविआ’चा ‘करेक्ट कार्यक्रम’; शुभांगी पाटलांच्या पदरी मोठा पराभव
Mlc election update | nashik Graduate Constituency : नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. पाचव्या फेरी अखेर तांबे यांना तब्बल ६८ हजार ९९९ मतं मिळाली तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतं पडली. मतमोजणी संपल्यानंतर तांबेंनी तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. महाविकास […]
ADVERTISEMENT
Mlc election update | nashik Graduate Constituency :
ADVERTISEMENT
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. पाचव्या फेरी अखेर तांबे यांना तब्बल ६८ हजार ९९९ मतं मिळाली तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतं पडली. मतमोजणी संपल्यानंतर तांबेंनी तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत विजयासाठीचा कोटा ५८ हजार ३१० होता. (mlc election update nashik Graduate Constituency independent candidate satyajeet tambe won)
विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत होता. इथून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता. मात्र अखेरच्या दिवशी इथे मोठा उलटफेर झाला होता. ११ जानेवारीला विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची घोषणा केली. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांचे पुत्र सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. AB फॉर्म त्यांना काँग्रेसचा काही मिळाला नाही.
हे वाचलं का?
MLC Election : नागो गाणार पराभूत : भाजपनं अंग काढलं? बावनकुळे म्हणाले…
काँग्रेसमधून केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा न देता अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तिसऱ्या बाजूला भाजपने अखेरपर्यंत इथून त्यांचा अधिकृत उमेदवारला मैदानात उतरवलं नाही, किंवा तांबे यांनाही अधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र आता निकालानंतर भाजपने सत्यजीत तांबे यांना छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय :
मात्र विजयानंतरही तांबे यांनी विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तांबे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांच नुकतचं अपघाती निधन झालं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. याशिवाय निकाल जाहीर होण्यापूर्वी तांबेंनी मानस पगार याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचही सांत्वन केलं होतं.
ADVERTISEMENT
विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.
सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.
मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 2, 2023
ट्विट करुन सत्यजीत तांबे म्हणाले, विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT