टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेचे फोटो वापरताना शिवसेनेला लाज वाटत नाही का? मनसेने डिवचलं
औरंगाबाद येथे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) १ मे रोजी सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) पुन्हा एकदा टीका केली आणि त्याचप्रमाणे भोंग्यांचा मुद्दाही उपस्थित केला होता. या सभेला बरीच गर्दी झाली होती. तसंच गुढीपाडव्यालाही सभा घेतली होती. यातला फोटो शिवसेनेने (Shivsena) त्यांच्या टिझरमध्ये वापरल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी (Gajanan Kale) केला […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद येथे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) १ मे रोजी सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) पुन्हा एकदा टीका केली आणि त्याचप्रमाणे भोंग्यांचा मुद्दाही उपस्थित केला होता. या सभेला बरीच गर्दी झाली होती. तसंच गुढीपाडव्यालाही सभा घेतली होती. यातला फोटो शिवसेनेने (Shivsena) त्यांच्या टिझरमध्ये वापरल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी (Gajanan Kale) केला आहे. तर मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या सभेचा फोटो टिझरमध्ये वापरताना शिवसेनेला लाज वाटत नाही का हा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण?
मनसेचे नेते गजानन काळे यांनी दावा केला आहे की शिवसेनेने लाँच केलेल्या टिझरमध्ये जे फोटो आणि दृश्यं वापरली आहेत ती राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी जी सभा घेतली आहे त्यातली आहेत. राज ठाकरे यांच्या सभेतली दृश्यं आणि फोटो शिवसेनेने टिझरमध्ये वापरल्याचा दावा गजानन काळे यांनी केला आहे.










