इगो बाजूला ठेऊन राज साहेबांना विचारलं असतं तर, साहेबांनी…: मनसे आमदार
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: राज्यसभा निवडणुकीत मनसे कोणाला मतदान करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे मनसे भाजपला मतदान करणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: राज्यसभा निवडणुकीत मनसे कोणाला मतदान करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे मनसे भाजपला मतदान करणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
यावर मनसे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मित्र आहेत. त्यांनी विनंती केली की तुमचा पाठिंबा तुम्ही भाजपाला देणार का? राज ठाकरेंनी देखील त्यांना सकारात्मकता दाखवली आहे. त्यांनी विनंती केली त्यामुळे आम्ही त्यांना मान दिला.’
तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेचं नाव न घेता टोला हाणत असं म्हटलं की, ‘इगो बाजूला ठेऊन राज साहेबांना विचारलं असत तर, साहेबांनी तोही विचार केला असता. परंतु काही लोक एमआयएम आणि अबू आझमीच्या मागे बिझी असल्यामुळे त्यांनी कदाचित विचार केला नसेल.’
‘आपल्या शहरात चाललेला ‘सासुरवास’ बघा’, राजू पाटलांचं खोचक ट्विट