पाटी बदलण्याचा खर्च जास्त की काचा बदलण्याचा? मनसेचा दुकानदारांना धमकीवजा इशारा

मुंबई तक

राज्य सरकारने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या लावणं अनिवार्य केल्यानंतर राज्यात आता हा मुद्दा पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईत काही दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्यासाठी विरोध केला असून काहींनी सध्या मंदीचं कारण देऊन हा खर्च परवडणार नसल्याचं सांगितलं. परंतू अशा दुकानदारांना मनसेने धमकीवजा इशारा देत आगामी काळात मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्य सरकारने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या लावणं अनिवार्य केल्यानंतर राज्यात आता हा मुद्दा पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईत काही दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्यासाठी विरोध केला असून काहींनी सध्या मंदीचं कारण देऊन हा खर्च परवडणार नसल्याचं सांगितलं.

परंतू अशा दुकानदारांना मनसेने धमकीवजा इशारा देत आगामी काळात मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असे संकेत दिले आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर, पाट्या बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा असा प्रश्न विचारला आहे.

राज्यात मराठी पाट्यांचा मुद्दा पहिल्यांदा चर्चेत आणण्याचं काम मनसेने केलं. राज ठाकरेंच्या खळ्ळ खट्याक भूमिकेमुळे मुंबईम मनसे सैनिकांनी अनेक दुकानांच्या काचा फोडल्या होत्या. राज्य सरकारने मराठी पाट्यांसंदर्भात नियमांमध्ये बदल केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचं कौतुक करत मराठी पाट्यांचं श्रेय हे मनसेलाच मिळायला हवं असं ठणकावून सांगितलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp