कल्याण: आधी पंढरपूर नंतर आधरवाडी… जेलमधून पसार झालेला भामटा ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवली हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस देखील अधिक सतर्क झाले असून गुन्हेगारांना आळा बसावा यासाठी ताबडतोब कारवाई करत असल्याचं दिसून येत. अशाच एका कारवाईत तब्बल दोन वेळा तुरुंगातून पळून गेलेला एका भामटा चोर कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश गायकवाड नावाचा हा चोरटा जेलमधून तब्बल दोनदा पळून गेल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. जेलमधून फरार झाल्यानंतर त्याने अनेक लुटीचे गुन्हे केल्याची माहिती देखील आता उजेडात आली आहे. त्याने चोरलेले पाच महागडे मोबाइलही यावेळी पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

दोनदा तुरुंगातून पळून गेलेला चोर नेमका कसा सापडला?

हे वाचलं का?

कल्याणमध्ये राहणारे मनिष गुप्ता यांची आई त्यांच्या मूळ गावी आझमगडला जाण्यासाठी निघाली होती. 22 डिसेंबर रोजी 11 वाजून 45 मिनिटांनी जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसने उत्तर प्रदेशला रवाना होणार होती. मुलगा मनिष आईला घेऊन कल्याण रेल्वे स्थानकात आला. मात्र, गाडी स्थानकात येण्यास वेळ होता.

यामुळे आईसाठी फळे खरेदी करण्याकरीता मनिष हा कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडला. एसटी स्टॅण्ड समोर उभ्या असलेल्या एका हातगाडीवरून त्याने फळे घेतली. याच दरम्यान त्याचा मोबाईल हिसकावून एक अज्ञात चोरटा पसार झाला.

ADVERTISEMENT

याप्रकरणी मनिषने त्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिली. कल्याणचे एसीपी उमेश माने-पाटील यांच्या मागदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी एक विशेष तपास पथक तयार केले.

ADVERTISEMENT

यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीचा तपास सुरु केला. गुप्त माहितीच्या आधारे कल्याण एसटी स्टॅण्डजवळ सापळा लावून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान अशी माहिती समोर आली की, याच तरुणाने मनिषचा मोबाइल चोरी केला होता. अविनाश गायकवाड असे या चोरट्याचं नाव आहे. जेव्हा पोलिसांनी अविनाश गायकवाड संदर्भात अधिक माहिती काढली तेव्हा पोलिसही हैराण झाले.

अविनाश हा 20 जुलै 2020 रोजी आधारवाडी कारागृहात त्याचा साथीदार श्याम चव्हाण सोबत पळून गेला होता.

डोंबिवली: भर रस्त्यात गळ्यावर चाकू लावत बॅंक मॅनेजरला लुटलं, भुरटे चोर CCTV मध्ये कैद

तुरुंगातून पळून गेल्यावर त्याने मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला होता. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाइल हस्तगत केले आहेत. अविनाश हा काही वर्षापूर्वी पंढरपूरच्या सोलापूर कारागृहातून पळून गेला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती.

आता मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश गायकवाडच्या विरोधात राज्यभरात तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता या अट्टल गुन्हेगाराविरोधात कल्याण पोलीस अधिक सखोल तपास करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT