मी पुन्हा सांगतो… मोदी खूप लोकप्रिय आहेत पण बंगालमध्ये विजय ममता दीदींचाच, तो देखील फार मोठा
प्रशांत किशोर, राजकीय रणनीतिकार सध्या संपूर्ण देशाचं लक्ष हे बंगालच्या निवडणुकीकडे लागलं आहे. सध्या माझ्या एका ऑडिओ क्लिपबाबत बरीच चर्चा सुरु आहे. त्याविषयी मी पहिल्यांदा काही गोष्टी सांगणार आहे. खरं तर मला समजत नाहीए की, मी जे काही बोललो आहे ते लीक कसं होऊ शकतं? कारण सगळं संभाषण हे पब्लिक डोमेनवर आहे. आता पहिली गोष्ट […]
ADVERTISEMENT

प्रशांत किशोर, राजकीय रणनीतिकार
सध्या संपूर्ण देशाचं लक्ष हे बंगालच्या निवडणुकीकडे लागलं आहे. सध्या माझ्या एका ऑडिओ क्लिपबाबत बरीच चर्चा सुरु आहे. त्याविषयी मी पहिल्यांदा काही गोष्टी सांगणार आहे. खरं तर मला समजत नाहीए की, मी जे काही बोललो आहे ते लीक कसं होऊ शकतं? कारण सगळं संभाषण हे पब्लिक डोमेनवर आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला क्रिकेटच्या भाषेत सांगतो नेमकं काय झालं ते. कारण आपला देश क्रिकेटप्रेमींचा आहे.
समजा इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच आहे. मॅच दरम्यान, तुम्ही जेव्हा इंडियाच्या कॅप्टनशी बातचीत कराल तेव्हा तुम्ही त्याला विचारालं की, तुम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाबाबत काय वाटतंय? तेव्हा भारतीय कर्णधार असं म्हणेल की, ऑस्ट्रेलियाची टीम चांगली आहे, ते जगज्जेते आहेत पण त्यांना पराभूत करण्यासाठी आमच्याकडे आमचा प्लॅन आहे. जर हा प्लॅन योग्यरित्या अंमलात आला तर आम्ही नक्कीच जिंकू. पण काही पत्रकार या बोलण्यातील दुसरा भाग टाळून पहिला भाग घेतात आणि त्याची मोठी बातमी होते. की, भारतीय कर्णधाराने पराभव मान्य केलाय… पण इथे मी ठामपणे सांगतोय की, आमचा पराभव होणार नाही.
“बंगालमध्ये BJP ने १०० जागा जिंकल्यास राजकीय अंदाज वर्तवणं सोडेन”










