Mohali Blast : कारमधून आले अन् थेट मुख्यालयावर डागले ग्रेनेड, मोहालीत नेमकं काय घडलं?
सीमावर्ती राज्य असलेल्या पंजाबात पोलीस गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर दोन हल्ले करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर मंगळवारीही हल्ला झाला. थेट गुप्तचर विभागाच्या कार्यालयावरच हल्ला झाल्यानं पंजाबात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी (९ मे) सायंकाळची वेळ होती. मोहालीत असलेल्या पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागात नेहमीप्रमाणेच हालचाली सुरू होत्या. घड्याळाचा काटा ७ वाजून ४५ मिनिटांवर गेला […]
ADVERTISEMENT
सीमावर्ती राज्य असलेल्या पंजाबात पोलीस गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर दोन हल्ले करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर मंगळवारीही हल्ला झाला. थेट गुप्तचर विभागाच्या कार्यालयावरच हल्ला झाल्यानं पंजाबात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सोमवारी (९ मे) सायंकाळची वेळ होती. मोहालीत असलेल्या पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागात नेहमीप्रमाणेच हालचाली सुरू होत्या. घड्याळाचा काटा ७ वाजून ४५ मिनिटांवर गेला आणि तिसऱ्या मजल्यावरील खिडकी फोडून एक वस्तू आत येऊन पडली. त्यानंतर एक मोठा स्फोट झाला.
अचानक झालेल्या स्फोटाने मुख्यालयात एकच धावपळ उडाली. त्यानंतर काय घडलं, याचा शोधाशोध सुरू होतो आणि कळत की, गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर हल्ला झाला आहे. रॉकेटमधून कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ग्रेनेड डागण्यात आलं.
हे वाचलं का?
आरपीजी म्हणजेच रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडच्या (Rocket Propelled Grenade) मदतीने हा हल्ला करण्यात आल्याचं अधिकच्या तपासातून स्पष्ट झालं. आरपीजीतून करण्यात आलेल्या हल्ल्यात नुकसान झालं नाही. मात्र ज्या ठिकाणावर हल्ला झाला, त्यावरून बरेच प्रश्न उपस्थित झाले.
ADVERTISEMENT
सोमवारी झालेल्या या हल्ल्याच्या कड्या पोलिसांकडून जुळवल्या जात असतानाच मंगळवारी दुपारी मोहालीत आणखी एक स्फोट झाला आहे. या घटनेची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याचा तपास केला जात आहेत.
ADVERTISEMENT
हल्ला कसा करण्यात आला?
मोहाली हल्ल्याच्या प्राथमिक तपास काही बाबी समोर आल्या. मोहालीतील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर दोन आरोपींनी हल्ला केला. दोन्ही आरोपी स्विफ्ट डिझायर कारमधून आले होते. तपासानुसार जवळपास ८० मीटर अंतरावरून त्यांनी आरजीपीतून ग्रेनेड डागलं.
रशियन शस्त्राचा वापर?
गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आरजीपीचा वापर झाल्याची माहिती समोर आली. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं आरजीपी रशियन निर्मित असल्याचंही बोललं जात आहे.
पंजाबमध्ये वापरण्यात आलेलं RPG रशियात बनवण्यात आलेलं RPG 26 Aglen असू शकतं, अशी शंका व्यक्त केली जात आहे. २०१६ मध्ये रशियातून सर्वप्रथम याचा फोटो समोर आला होता.
दोन्ही रॉकेटची मार्किंग एकसारखीच असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मोहालीत हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं आरपीजी रशियन असावं, अशी चर्चा होतं आहे.
मोहालीतील घटना दहशतवादी हल्ला?
२४ तासांत झालेल्या दोन हल्ल्यांनी पाकिस्तान सीमेलगत असलेल्या पंजाबातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पतियाळात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर ही घटना घडली असून, त्या अंगानेही याची चौकशी केली जात आहे.
पंजाब पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास एनआयएने (NIA) सुरू केला आहे. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य वाढलं आहे. एनआयएचं पथक सोमवारी मोहालीत पोहोचलं आणि मंगळवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिली.
गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर हल्ला कुणी केला?
पंजाब पोलीस आणि एनआयएकडून हल्ल्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. मोहालीतील हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. पण, या हल्ल्यानंतर खलिस्तानीवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसने धमकी दिली आहे.
शीख फॉर जस्टिसचा स्वंयघोषित जनरल गुरपतवंत सिंह पन्नू हा इशारा दिला आहे. मोहालीत जसा हल्ला झाला, तसा हल्ला शिमला पोलिसांच्या मुख्यालयावर होऊ शकतो,’ असं त्याने म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT