नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करावेत किंवा राजीनामा द्यावा, मोहित कंबोज यांची मागणी
नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करावेत किंवा राजीनामा द्यावा असं आता भाजपच्या मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी जे आरोप केले आहेत तसे आरोप ड्रग्ज घेतलेला एखादा माणूसच करू शकतो. महाराष्ट्राचा जबाबदार मंत्री करू शकत नाही एकतर नवाब मलिक यांनी पुरावे द्यावेत किंवा राजीनामा द्यावा अशी मागणी आता मोहित कंबोज यांनी केली आहे. […]
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करावेत किंवा राजीनामा द्यावा असं आता भाजपच्या मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी जे आरोप केले आहेत तसे आरोप ड्रग्ज घेतलेला एखादा माणूसच करू शकतो. महाराष्ट्राचा जबाबदार मंत्री करू शकत नाही एकतर नवाब मलिक यांनी पुरावे द्यावेत किंवा राजीनामा द्यावा अशी मागणी आता मोहित कंबोज यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हा आरोप केला होता की NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांची भेट झाली होती. तसंच क्रूझमधल्या रेडमधून 11 जणांना अटक झाली होती. मात्र त्यातल्या ऋषभ सचदेवासह तिघांना सोडण्यात आलं. NCB ची कारवाई हा सगळा बनाव असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांना आता मोहित कंबोज यांनी उत्तर दिलं आहे.
आज मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी आरोप सिद्ध करा किंवा राजीनामा द्या अशी मागणीही केली आहे.
हे वाचलं का?
मोहित कंबोज म्हणाले की, मी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही नाही. मी चैाकशीसाठी तयार आहे. माझ्यावर आरोप लावले की एनसीबीच्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे. पण माझ्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही आणि मी दीड वर्षांपासून राजकारणापासून अप्लित आहे. ऋषभ सचदेवा माझा मेव्हणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे? याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावे, आर्यन खान सोबत त्याची कधीही भेट झाली नाही. आम्ही एनसीबीच्या चैाकशीसाठी तयार आहोत. मात्र, नवाब मलिक यांन केलेल सर्व आरोप खोटे आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT