वाशिम : मंदिराच्या छतावर सुरु होता माकडांचा हैदोस, सफाईसाठी आलेल्या व्यक्तीचा स्लॅब कोसळून मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मृत्यू कधी आणि कोणत्या मार्गाने आपल्या समोर येईल याची शाश्वती नसते असं अनेकदा बोललं जातं. वाशिम जिल्ह्यात आज याचाच प्रत्यय आला आहे. मंदिराच्या छतावर माकडांची एक टोळी सतत हैदोस घालत होती. याचदरम्यान मंदिरात साफसफाईसाठी आलेल्या एका व्यक्तीचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली आल्यामुळे मृत्यू झालाय.

ADVERTISEMENT

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात खंडू महाराज संस्थान नावाचं एक छोटसं मंदीर आहे. आज सकाळपासून या मंदिरावर माकडांची एक टोळी हैदोस घालत होती. याच दरम्यान मंदिराची साफसफाई करण्यासाठी सुरेश धूत हा व्यक्ती आता आला. याचदरम्यान मंदिराचा एक स्लॅब कोसळून त्याचा संपूर्ण ढिगारा सुरेशच्या अंगावर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक सुरेश धुतचा कुलुप विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

हे वाचलं का?

उस्मानाबादेत तेलाचा टँकर उलटला, स्थानिकांची तेल पळवण्यासाठी गर्दी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT